Monday, May 20, 2024
Homeजिल्हामहागाई, बेरोजगारी विरोधात डावे पक्ष मैदानात, देशव्यापी आंदोलनाचा नारा

महागाई, बेरोजगारी विरोधात डावे पक्ष मैदानात, देशव्यापी आंदोलनाचा नारा

मुंबई : महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध डाव्या पक्षांनी ( left parties) २५ – ३१ मे दरम्यान देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करावे, अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे.

दि. २३ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist party Of India), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Communist party Of India), शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले-लिबरेशन) यांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात परिवर्तनवादी आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न !

२५ – ३१ मे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांवर जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

बैठकीस माकपचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. एस. के. रेगे; भाकपचे तुकाराम भस्मे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, सुभाष लांडे; शेकाप चे राजू कोरडे; लानिप चे भीमराव बनसोड, राजेंद्र बावके; आणि भाकप (माले) लिबरेशन चे श्याम गोहिल व अजित पाटील उपस्थित होते.

या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, इत्यादीही सहभागी होणार आहेत.

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

टोमॅटो शंभरी पार ; शेतकरी सुखावला !

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ; निवृत्तीचे वय व पेन्शनची रक्कम वाढणार !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय