Saturday, April 27, 2024
Homeजिल्हाबिग ब्रेकिंग : पुण्यात लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या तरूणाला अटक

बिग ब्रेकिंग : पुण्यात लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या तरूणाला अटक

पुणे : पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने ( ATS – Anti Terriosm Squad) ही मोठी कारवाई केली आहे. लष्कर ए तोयबासाठी काम करणार्‍या व दहशतवादी संघटनेकडून फंडिंग घेणार्‍या मोहम्मद जुनेदला दापोडीतून अटक केली आहे. 

जुनेद मोहमद हा दहशतवादी संघटनेकडून फंडिंग घेत असल्याचेही दहशतवादी विरोधी पथकाने म्हटले आहे. शिवाजीनगर येथील दहशतवादी विरोधी पथकाच्या कार्यालयात जुनेदची चौकशी सुरू आहे. दुपारनंतर त्याला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पथकाने दापोडीत पहाटे छापेमारी करत ही कारवाई केली असून, 28 वर्षीय जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. जुनेद सोशल मीडियावरून जम्मू काश्मिरच्या लष्कर ए तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात आला होता. तो लष्कर ए तोयबासाठी दहशतवादी पुरविण्याचे काम करत असल्याचे महाराष्ट्र एटीएस ने म्हटले आहे.

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार, कसे ते पहा !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय