Friday, November 22, 2024
Homeआरोग्यदिलासादायक:-औरंगाबाद जिल्ह्यात आज केवळ ११७ रुग्णांची नव्याने वाढ,वाचा सविस्तर

दिलासादायक:-औरंगाबाद जिल्ह्यात आज केवळ ११७ रुग्णांची नव्याने वाढ,वाचा सविस्तर

औरंगाबाद, (दि.२८) : औरंगाबाद जिल्ह्यात आज ३८५ जणांना (मनपा २४९, ग्रामीण १३६) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ९३३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ११७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३६९ झाली आहे. आजपर्यंत एकूण ४५८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३५७३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दुपारनंतर ४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर २३, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २४ रूग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

सिटी इंट्री पॉइंट (२३)

 संत ज्ञानेश्वर नगर (२), सिडको महानगर (१), बजाज नगर (२), एन सात(१), अन्य (२)भावसिंगपुरा (१), रांजणगाव (१), छावणी (१), सीआरपीएफ, सातारा परिसर (२), पिशोर (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), रिलायन्स मॉल जवळ (१), शिवनेरी कॉलनी (१), नक्षत्रवाडी (३), एन नऊ प्रतापगड नगर (१), गरम पाणी परिसर (१), म्हाडा कॉलनी (१)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

 खाजगी रुग्णालयात खोकडपुऱ्यातील ५८ आणि ४६ वर्षीय पुरुष,  अहिल्याबाई पुतळ्याजवळील ७० वर्षीय तर रोजाबागमधील ६१ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    

संबंधित लेख

लोकप्रिय