Photo : Twitter / @ShashiTharoor |
मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युध्दाचा आज तिसरा दिवस आहे, या युध्दादरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलाने युक्रेनचा ध्वज तर मुलीने रशियाचा ध्वज घातला असून फोटोमध्ये दोघेही मिठी मारत आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू झाल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी हा फोटो शेअर केला, त्यांनी सोबत लिहले कि, ‘करूणा : युक्रेनचा झेंडा लपेटलेला युवक रशियाच्या झेंड्यातील युवतीला प्रेमाणे आलिंगन देत आहे. प्रेम, शांतता आणि सहजीवन युद्ध आणि संघर्षावर मोठा विजय मिळवले अशी आशा करूयात.’ यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत त्यावर चर्चाही खूप झाली.
Poignant: A man draped in the Ukrainian flag embraces a woman wearing the Russian flag. Let us hope love, peace & co-existence triumph over war & conflict. pic.twitter.com/WTwSOBgIFK
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 25, 2022
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो फोटो सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यानचा असल्याचा समज लोकांचा झाला आहे. मात्र या फोटोची पडताळणी केली असता हा फोटो ३ वर्षे जुना असल्याचे समोर आले. तसेच हा फोटो तीन वर्षांपूर्वीही व्हायरल झाला होता.
द वॉशिंग्टन पोस्टच्या मते, या फोटोत दिसत असलेल्या मुलीचे नाव ज्युलियाना कुझनेत्सोवा आहे. रशियाने २०१४ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यावेळी तिच्या मंगेतर सोबत हा फोटो पोलंडमध्ये एका मैफिलीत असताना काढण्यात आला. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो २०१९ मध्येही चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा सुरू असलेल्या युध्दाच्या पार्श्वभुमीवर हा फोटो व्हायरल होत आहे.
असे असले तरी हा फोटो युद्धाने नव्हे तर प्रेमाने प्रश्न सोडवता येतील हा संदेश जगाला देतो आहे.