Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडयेरवडा दुर्घटना मृताच्या वारसानां प्रत्येकी पाच लाख अर्थसहाय्य सुपुर्त, जखमीनां दोन लाख...

येरवडा दुर्घटना मृताच्या वारसानां प्रत्येकी पाच लाख अर्थसहाय्य सुपुर्त, जखमीनां दोन लाख रूपये

पिंपरी : शास्त्रीनगर, येरवडा येथे ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील व्यवसायिक संकुलाचे पायासाठी बनवलेल्या लोखंडी जाळी चा सांगाडा कोसळून ३ फेब्रुवारी रोजी  झालेल्या दुर्घटनेत मध्ये पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार,कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने जाहिर केल्यानुसार मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर जखमींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्यात आले. 

कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे धनादेश दिले. यावेळी कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर, आमदार सुनील टिंगरे, केंद्रीय वेतन अयोगाचे सदस्य चंदन कुमार, कामगार नेते काशिनाथ नखाते, ज्येष्ठ नेते नितीन पवार, मोहम्मद नदाफ, ॲड मोहन वाडेकर, आदीसह बिहारचे कामगार कुटुंबे उपस्थित होते. 

रशिया – युक्रेन युद्धाच्या सावटाखाली प्रेम कहानीच्या व्हायरल होत असलेल्या फोटो मागचे सत्य वाचा !

यावेळी अभय गीते म्हणाले, झालेली घटना दुख:द  आहे. आम्ही तातडीने घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला राज्य शासनाने तातडीने मंजुरी दिली, त्यानुसार आज कामगारांच्या कुटुंबियांना अर्थ सहाय्य दिले आहे. यापुढे कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार केले जातील.

७ फेब्रुवारी ला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात यावे  या घटनेत जे जे दोषी आहेत ते ठेकेदार, व  मुळ मालकावर  गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कामगार संघटनांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे भेट घेऊन चर्चा  तसेच मुख्यमंत्री, कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे केली होती.

युक्रेनच्या वृद्ध महिलेेने रशियन सैनिकाला भर चौकात झापले, म्हणाली…!

सदर दुर्घटनेत सोहेल मोहम्मद, मोहम्मद शमीर, मोबिद आलम, मोहम्मद आलम, ताकाजी आलम या कामगारांचा मृत्यू झाला होता तर मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद फईम, मोहम्मद आलम, मोहम्मद रफिक मोहम्मद साहिल हे कामगार जखमी झाले होते.

वर्किंग पीपल्स चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार संघटनानी पाठपुरावा केला. यामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ गायत्री सिंग, राष्ट्रीय वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, बिलाल खान, दीपक पराडकर, डॉ. शैला, राजू वंजारे, मोहम्मद नदाफ आदी सहभागी झाले.

पुणे : जुन्नरला सातवाहन कालीन मातीच्या भांड्याचे अवशेष आढळले

तर ५ लाख किलोचे स्पेस स्टेशन चीन किंवा भारतावर पाडायचे का? रशियाचा अमेरिकेला इशारा

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय