Thursday, May 2, 2024
Homeआरोग्यवीज गेल्यास काय करावे अन् काय करु नये? वाचा तर मग.

वीज गेल्यास काय करावे अन् काय करु नये? वाचा तर मग.

● घरामध्ये RCCB (Residual Current Circuit Breaker)  किंवा ELCB ( Earth Leakage Circuit Breaker) Switch असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जिवितहानी टाळता येईल.

● अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे तसेच गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

● वीज उपकरणे, वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

● वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

● विद्युत खांबाला व ताणाला (stay) जनावरे बांधू नयेत.

● विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नयेत.

● वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.

● बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती आपणाकडे असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा. जेणेकरुन तातडीने बिघाड दुरूस्ती करुन वीजपुरवठा वेळेत सुरळीत करण्यास मदत होईल.

● विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी.

● नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीजमिटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय