Friday, November 22, 2024
Homeजिल्हाDYFI तर्फे लाडगाव फाटा येथे विविध प्रश्नांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन 

DYFI तर्फे लाडगाव फाटा येथे विविध प्रश्नांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन 

सुरगाणा, दि. २३ : सुरगाणा तालुक्यातील लाडगाव फाटा येथे भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सुरगाणा तालुका कमिटीच्या वतीने विविध प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुक्यातील युवक युवती मोठ्या संख्येने एकत्र आले, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी  रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी नाशिक  सुरगाणा या महामार्गावर चार तास वाहतूक रोखून धरली होती यामुळे नाशिक व सुरगाणा जाणाऱ्या सर्व वाहनांना कोंडी निर्माण झाली होती. 

यावेळी तालुक्यातील विविध रखडलेली कामे तसेच आरोग्य केंद्रातील विविध समस्या या त्वरित सुधाराव्यात तसेच आश्रम शाळेतील साहित्य तालुक्यातील रस्ते, आरोग्य सुविधा यात अँबुलन्स, फिरते आरोग्य पथक, औषधांचा तुटवडा, निवासी वैद्यकीय अधिकारी, लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे त्वरित सुरु करा, खराब रस्त्यांची दुरुस्ती करा, २०२२ मध्ये उद्घाटन झालेली कामे त्वरित सुरु करा, जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करा, बारा तास सलगपणे शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करा, सिगलफेज लाईटचा लपंडाव थांबवा, तालुक्यात बीएसएनएल टॉवर उभारा, ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या युवकांना हक्काचे घर, हाताला काम मिळवुन द्या, विविध विभागातील नोकर भरती त्वरित करा, आदी मागण्या करण्यात आल्या. तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.

“तालुक्यात विविध समस्या आहेत. तहसीलदार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले. पंधरा दिवसात जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या नाहीत तर पुढील काळामध्ये नाशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.”

– कॉ.पांडुरंग गायकवाड, तालुका सेक्रेटरी (DYFI) 

या आंदोलनाचे नेतृत्व डी वाय एफ आय चे जिल्हाध्यक्ष कॉ.इंद्रजीत गावीत, तालुका सेक्रेटरी कॉ. पांडुरंग गायकवाड, अध्यक्ष नितीन गावीत, उपाध्यक्ष अशोक धूम, चंद्रकांत वाघेरे, रोहिणी वाघेरे यांनी केले. मेनका पवार, मनीषाताई महाले, भारती चौधरी, अशोक भोये, संजिवनी चौधरी सरपंच – लाडगाव, सुशिला गायकवाड, कैलाश भोये पप्पू राऊत, सरपंच बुबळी देवा हाडळ, केदु वाघमारे, चिकाडी चे सरपंच सदुभाऊ बागुल, भागवत गायकवाड, प्रविण गावित, मोहन पवार, योगश वाघमारे, दिनकर राऊत, कैलास गावित, कान्हा हिरे, बळवंत देशमुख, दिनेश भोये, भास्कर महाले, पंढरीनाथ चौधरी, वसंत कामडी, सोनिराम गांगुर्डे, पुंडलिक भुसारे, जगदीश गवळी, भागवत गवळी, भास्कर बागुल, महिंद्र पीठे, तुळशीराम खोटरे, लिलाधर चौधरी तसेच विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय