Tuesday, December 3, 2024
Homeकृषीनवीन कृषी कायद्याच्या विरोधात किसान सभेचा सिरसाळयात रास्ता रोको आंदोलन

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात किसान सभेचा सिरसाळयात रास्ता रोको आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

परळी वैजनाथ : केंद्र सरकारने ५ जून रोजी जारी केलेले शेतकरी विधेयके आणि वीज बिल कायद्यातील बदलाचे अध्यादेश संसदेत पास केलेल्या आहेत. या नवीन बिलांना आणि विधेयकांना मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यासाठी २५ सप्टेंबरला देशव्यापी बंद आणि निषेध निदर्शनाची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितिच्या वतीने देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शारीरिक अंतर राखून आणि कोविड काळातील सर्व नियमांचे पालन करत सिरसाळा येथील परळी-बीड महामार्गावरील मुख्य चौकात शुक्रवारी दि. २५ रोजी जोरदार निदर्शने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी शेतकऱ्यानी शेतकरी कायदा विरोधी, कामगार कायदा विरोधी घोषणा दिल्या व स्वामिनाथन आयोग लागू करा, अशी मागणी केली तसेच शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. 

यावेळी किसान सभेचे नेते अॅड. अजय बुरांडे माकपचे तालुका सचिव काॅ. गंगाधर पोटभरे, किसान सभा जिल्हा सचिव काॅ. मुरलीधर नागरगोजे, काॅ. बडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

या वेळी किसान सभेचे काॅ. विष्णु देशमुख, काॅ. बालाजी कडभाने, अंकुश उबाळे, आण्णा खडके, भगवान शिंदे, काॅ नवघरे काॅ. मदन वाघमारे, काॅ. प्रकाश उजगरे, काॅ.विशाल देशमुख, काॅ.महादेव शेरकर,काॅ.अनुरथ  गायकवाड काॅ.मनोज देशमुख कॉ. मनोज स्वामी कॉ.अशोक शेरकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय