Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:राष्ट्रसंत गाडगेबाबा हे आधुनिक काळातील चालते बोलते विद्यापीठ-मानव कांबळे

PCMC:राष्ट्रसंत गाडगेबाबा हे आधुनिक काळातील चालते बोलते विद्यापीठ-मानव कांबळे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२०-डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत जेष्ठ विचारवंत मानव कांबळे म्हणाले की,
—“गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब,दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |”असे सांगत दीन,दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा
विवेकवादी विचारांचे प्रबोधन करायचे.त्यांनी कर्मकांडांना सतत विरोध केला,शिक्षणाचे महत्व पटवून दिले.अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळाअनाथालयेआश्रम, व विद्यालये सुरू केली.डोक्यावर झिंज्या,त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी,एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू,दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.गाडगेमहाराज हे चालते बोलते विद्यापीठ होते,असे मानव कांबळे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर,परीट सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष संतोष भालेकर,माजी नगरसेवक बन्सी पारडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनाजी येळकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मानव कांबळे,माजी नगरसेवक बन्सी पारडे,वैशाली राऊत, सुमन अभंग,मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव,मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक वैभव जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे बापूसाहेब गायकवाड,शिवसेना युवा कार्यकर्ते निखिल दळवी, पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेचे अध्यक्ष सुनील पवार,बाराबलुतेदार महासंघाचे प्रदीप पवार, वंचित बहुजन आघाडीचे संतोष जोगदंड,आम आदमी पक्षाचे ब्रह्मानंद जाधव अशा अनेक पिंपरी चिंचवड शहरातील संघटना व पक्षाच्या मार्फत आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय