कोरोना विषाणूने पुन्हा एकदा भारतात एन्ट्री केली आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.सिंधुदुर्गामध्ये जे-१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शनचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या काही दिवसांपासून २९२ प्रकरणे केरळमध्ये आढळून आले. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटवर संशोधन सुरु आहे. गोव्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर केरळ आणि महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळला आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत अलर्ट
सफदरजंग रुग्णालयाचे डॉ. रोहित कुमार म्हणाले की, कोरोना हा आरएनए विषाणू असून त्याचे अनेक व्हेरिएंट समोर येत आहे. दिल्लीमध्ये सध्यातरी एकही रुग्ण सापडलेला नाही. परंतु, याचा धोका पसरु नये म्हणून आरोग्यविभाग आणि प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे.
घराबाहेर पडण्यापूर्वी डॉक्टरांनी दिला सल्ला
डॉक्टरांनी सांगितले की, जर कुणालाही सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि दमा असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. तसेच मधुमेह (Diabetes) आणि हृदयाच्या संबंधीत आजार (Disease) असणाऱ्या लोकांनीही काळजी घ्यावी.