Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरजुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रमेश ढोमसे

जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रमेश ढोमसे

जुन्नर : जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका टी. डी. एफ. व जुन्नर तालुका माध्य. शिक्षिका संघ यांची संयुक्त सहविचार सभा महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे विश्वस्त के.एस.ढोमसे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सहविचार सभेमध्ये जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी रमेश देवराम ढोमसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

तसेच सचिवपदी राजेंद्र सुतार यांची, सहकार्यवाहपदी  अमित झरेकर यांची निवड करण्यात आली. तसेच जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघाच्या उपाध्यक्षपदी ज्ञानमंदिर हायस्कूल आळेच्या अर्चना भारती, खजिनदारपदी न्यू इंग्लिश स्कूल खामुंडीच्या नांगरे मॅडम, सहकार्यवाहपदी श्री संभाजी विद्यालय बोरी बुद्रुक च्या उषा गिरी व सल्लागारपदी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नरच्या सरिता कलढोणे यांची निवड झाली. 

यावेळी निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे जिल्हा टी. डी. एफ.चे कार्यवाह राजेंद्र पडवळ, तसेच यादव चासकर ,  सत्यवान ठाकूर उपस्थित होते. या सहविचार सभेला महाराष्ट्र राज्य टी. डी. एफ.चे राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव पंकज घोलप, जुन्नर तालुका टी. डी. एफ. चे सचिव रवींद्र डुंबरे, माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, डी.जी.सोनवणे, बी.जी‌.शिंदे, जे.जी.गाढवे, पी.एम.जाधव, रामदास डुंबरे, प्रशांत घुले, किशोर पगार, हनिफ शेख, चंद्रकांत दुरगुडे, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षा सरिता आबक, सचिव कमल शिरोळे, मिरा डुंबरे, रुपाली आवारी, राजश्री भालेकर, राजश्री खुळे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका टिडिएफ आणि जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष कांबळे यांनी केले. भाऊसाहेब खाडे यांनी आभार मानले. रमेश ढोमसे हे जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील न्यू इंग्लिश स्कुल, राजुर नं 1 येथे माध्यमिक शिक्षक आहेत.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय