Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरजुन्नर : आदिमाया शक्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जुन्नर : आदिमाया शक्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जुन्नर : गडकिल्ले हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव असून त्यांचे आपण जतन व संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक प्रा. विनायक खोत यांनी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात केले.

मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते आदिमाया शक्ती विद्यालय इंगळुन येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंगळूण गावच्या सरपंच पुष्पा डामसे होत्या. 

या संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील गड किल्ल्यांच्या परिसरातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यात सॅक, खोडरबर, पेन, पेन्सिल, स्केल, कंपास बॉक्स आदि साहित्याचा समावेश आहे.

याप्रसंगी संस्थेचे तानाजी गीते, आशिष जाधव, प्रदीप ननावरे, किरण गावडे, सुनील जवंजाळ, नितीन माळी, निलेश काळे, सागर जाधव, किरण गावडे, अनिकेत तुळेकर, दयानंद चव्हाण, विनोद पाटील, नयना पाटील, योगेश अंबिले, निलेश सुतार, कुंदन गाढवे, अमोल ढोबळे हे सभासद उपस्थित होते. याप्रसंगी गावचे पोलीस पाटील दगडू महादू डामसे, उपसरपंच रंजना रोहिदास डोळस, पालक बाळासाहेब बोराडे, बाळू बोराडे, रामदास राघू डामसे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.ढोबळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.आय. इनामदार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन एस.एल.आल्हाट, पी.एस.खुडे, ऋषिकेश वाघचौरे, दीपक तांबे यांनी केले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय