Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयअयोध्येतील राम मंदिर म्हणजे कोट्यवधी लोकांच्या सामूहिक शक्तीचं प्रतीक-पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

अयोध्येतील राम मंदिर म्हणजे कोट्यवधी लोकांच्या सामूहिक शक्तीचं प्रतीक-पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

अयोध्या:- अयोध्येतलं श्रीराम मंदीर हे शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं आणि कोट्यवधी लोकांच्या सामुहिक शक्तीचं प्रतीक असेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत या मंदिराचं भूमिपूजन झालं, त्यानंतर ते बोलत होते.

 गेल्या अनेक शतकांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली, असं सांगतानाच पंतप्रधानांनी हे मंदीर भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल, असं म्हटलं. या मंदिरामुळे या परिसराचं अर्थतंत्र बदलेल, प्रत्येक क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होतील, तसंच उपलब्ध संधींमध्ये वाढ होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

रामजन्मभूमी मंदीर निर्माण कार्याच्या कोनशीलेचं अनावरणही तसंच यानिमित्तानं जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय