Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा विवाह सोहळा संपन्न, अनेक नेत्यांची हजेरी

चंदीगड, ७ जुलै : नुकताच पंजाबच्या मान सरकारचा कॅबिनेट विस्तार झाला. यानंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान आपल्या संसाराची घडीही पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनीही विवाह सोहळ्याला हजेरी लावली.

---Advertisement---

भगवंत मान यांनी ६ वर्षांपूर्वी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला. सध्या इंद्रप्रीत आपल्या मुलांसह अमेरिकेत राहत आहे. विशेष म्हणजे मान यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांची दोन्ही मुले उपस्थित होती. घटस्फोटानंतर मान यांनी आपली संपूर्ण संपत्ती तिच्या नावे केल्याचे सांगितले जात आहे. भगवंत मान यांची आई हरपाल यांची इच्छा होती की मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांचा संसार पुन्हा सुरू करावा. आई आणि बहीण मनप्रीत कौर यांनी स्वतः मुलीची सीएम भगवंत मान यांच्यासाठी निवड केली आहे.

मान आणि डॉ कौर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आप नेत्यासोबत प्रचारही केल्याचे वृत्त आहे. गुरूवारी चंदीगडच्या सीएम हाऊसमध्ये अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे अनेक बडे नेते उपस्थित होते. त्यांच्या लग्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles