Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अभिनेता सलमान खान नंतर आता त्याच्या वकीलांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला काही दिवसांपुर्वी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाले होते. आता सलमानचे वकील एच सारस्वत यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. या पत्रामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. या धमकीप्रकरणी सलमान खानच्या वकीलांना पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

---Advertisement---

पंजाबमध्ये नव्याने स्थापन झालेल्या भगवंत मान सरकारने गायक सिद्धू मूसवालाची सुरक्षा कमी करण्यात आली. त्यानंतर काही तासाच सिद्धू मूसवाला यांची २९ मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येनंतर सलमानलाही असंच धमकीचं पत्र आलं होतं. त्यानंतर आता सलमान खानच्या वकिलांनाही धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात, वकील सिद्धू मूसवालाच्या नशिबी आले तेच तुमच्या वाट्याला येईल, असे म्हटले आहे.

पीटीआयनुसार, ३ जुलै रोजी वकिलांचे कार्यालय असलेल्या उच्च न्यायालयाच्या ज्युबली चेंबरच्या दारात धमकीचे पत्र सापडले. या पत्रात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकावण्यात आल्याचे संकेतही आढळून आले आहेत. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

---Advertisement---

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई ?
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याविरोधात ५० पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles