राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, कामगार सेल, एन टी यु एफ पुणे येथे राज्यव्यापी बैठक संपन्न. (Pune)
पुणे / क्रांतीकुमार कडुलकर – महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून शेतकरी, कामगार,युवक,महिला,उद्योग, माहिती तंत्रज्ञान याबाबत दूरदृष्टीतून केलेले कार्य हिताचे ठरले असून लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तसेच कामगारानीं महाविकास आघाडीचे अधिक उमेदवार निवडून आणले. (Pune)
गेल्या १० वर्षात श्रमिक, कामगारावरती अन्याय करणाऱ्या, जुने कायदे मोडून जुलमी श्रमसंहिता लागू करणाऱ्या महायुती सरकारला सत्तेतून घालवून राज्यात महाविकास आघाडी ला सत्तेत बसवण्यासाठी कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार तसेच महाविकास आघाडीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प आजच्या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार कामगार सेल,असंघटित कामगार विभाग, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन प्रदेश कार्यकारिणी , जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी यांची विधानसभा संकल्प व कामगार संघटनांचे प्रश्न याबाबत राज्यव्यापी बैठक आज पुणे येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे,असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते,सरचिटणीस सोमनाथ शिंदे, सहसचिव निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, मुंबईचे उमेश शिंदे,संभाजीनगर चे दिपक थोरात, कोकण विभाग शरद जावळे, वर्धा चे कुंडलिक पांडे, ठाणे चे प्रमोद बोराडे, सोलापूरचे गोवर्धन संचु, कमल कुलट, जयदीप बदडे, नागपूरचे सुजितसिंह ठाकूर, सचिव तुषार घाटुळे, माध्यम सचिव सुरज देशमाने ,भरतराव रुपनवर, धुरजी शिंदे, संघटक सुनील नलावडे निमंत्रक अमोल गायकवाड आदीसह राज्य पदाधिकारी उपस्थित होते. (Pune)
भाजपाने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या दहा वर्षांमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी,कामगार, महिला,छोटे उद्योजक हे त्रस्त झालेले असून त्यांच्यापुढे संकटाचा डोंगर उभा राहिलेला आहे.
कोरोनाच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांना सभगृहाबाहेर घालवून शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी कायदे आणले त्याचा परिणाम भयानक झालेला असून कामगारांचे शोषण होत आहे कामगारांना कामगार म्हणून आज जगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कामगार आज हक्कही मागू शकत नाही, भाजपशासित राज्यांमध्ये कामगार कायदे लागू नसल्याने प्रचंड नुकसान होत आहे इलेक्ट्रोबॉण्ड घेऊन उद्योजकांना, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात आल्या आहेत.
तरुणांच्या हाती रोजगार न देता धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत आहे. राज्यात किमान आणि समान वेतनाची अंमलबजावणी होत नाही, महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनता त्रस्त असून लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ही भाजपच्या जुलमी सरकारला घालवून महाविकास आघाडी य सरकार सत्तेत बसवण्याचा निश्चय आज करण्यात आला. बैठकीदरम्यान विविध पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे तसेच संघटनेशी संलग्न झालेल्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.