Friday, October 18, 2024
Homeजिल्हाPune : बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी तीव्र आंदोलन, शेकडो अनुयायांची सहभाग

Pune : बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी तीव्र आंदोलन, शेकडो अनुयायांची सहभाग

Pune : राज्यातील विविध बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी आणि संबंधित मागण्यांसाठी पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. पातळेश्वर येथील पुरातत्व विभागीय कार्यालयासमोर झालेल्या या धरणे आंदोलनात शेकडो बौद्ध बांधव, अभ्यासक, आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनाचे आयोजन सेव बुद्धा केव अँड हेरिटेज संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

प्रमुख मागण्या लेण्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासंदर्भातील होत्या. यामध्ये घोरावाडी (शेलारवाडी), बेडसे, कार्ला, भाजे यांसारख्या प्रमुख बौद्ध लेण्यांवर दिशादर्शक फलक लावणे, तसेच दुर्लक्षित लेण्यांचे तातडीने संरक्षण करणे, अशा विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या. (Pune)

याशिवाय, जुन्नर तालुक्यातील अंबा अंबिका भीमाशंकर लेणीला जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व विजेची सुविधा, तसेच भंडारा डोंगर येथील बौद्ध स्तुपाचे संवर्धन, कोंडाणे लेण्यांच्या पावसाळ्यातील गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे या मागण्यांचा समावेश होता.

या आंदोलनात प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अहिरे, दीपक गायकवाड, शैलेंद्र मोरे, महेंद्र कांबळे आणि सचिन साठे यांसह महाराष्ट्रातील विविध बौद्ध लेणी संवर्धन कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

प्रमुख मागण्या:

  1. सर्व बौद्ध लेण्यांवर दिशादर्शक फलक लावणे.
  2. दुर्लक्षित बौद्ध लेण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे.
  3. पर्यटकांसाठी रस्ते, पाणी, वीज, आणि सुरक्षा सुविधा पुरवणे.
  4. कार्ला, भाजे, बडसे लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करणे.
  5. वृद्ध व पर्यटकांसाठी रोप-वे सुविधा सुरु करणे.

आंदोलकांनी या मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास राज्यभरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय