पुणे – ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे ही संस्था गेली पाच वर्षापासून वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तूविशारद, लोलक विशारद,अंकशास्त्र, वास्तुभूषण, वास्तु रत्न, संसार सुखाचा कसा करावा या वर्गाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेत असून दीड हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या वर्गाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. (Pune)
या सर्व प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ रविवार दि.20 ऑक्टोबर 2024 रोजी ‘ विणकर सभागृह पद्मावती धनकवडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रमलगुरु सर्वशी चंद्रकांत दादा शेवाळे, अनिल चांदवडकर, दत्तोपासक प्रिया मालवणकर ज्यो. सौ. अंजली पोतदार, अनिरुद्ध इनामदार हे उपस्थित राहणार असून यांच्या हस्ते ऐकूण 170 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
तसेच सर्वात जास्त वास्तु व्हिजिट केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष असा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी गुरुजी विद्यार्थ्यांना विशेष असे मार्गदर्शन करणार असून वास्तु व्हिजिटचे प्रॅक्टिकल घेणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी कळविले आहे.