पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका बॅचमेटला कॉलेज प्रशासनाने काढून टाकल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु आहे. अशातच आता पुन्हा एका विद्यार्थ्याचीही प्रकृती खालावली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Pune FTII Hunger Strike) यापूर्वी एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली होती.
15 मे पासून विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये आंदोलन करत आहेत. 2020 च्या बॅचच्या विद्यार्थ्याला बाहेर काढल्याबद्दल कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते. पाच विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता संस्थेतून काढून टाकण्यात आल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटलं आहे.
त्यापैकी चौघांना 1 मे रोजी झालेल्या परिषदेच्या बैठकीनंतर वर्गात जाण्याची परवानगी देण्यात आली होती, तर एका विद्यार्थ्याला परवानगी नव्हती. विद्यार्थ्याला कमी उपस्थिती आणि क्रेडिट्समुळे त्यांना परीक्षा देण्यास नकार दिला होता. हा विद्यार्थी मानसिक तणावात होता. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू होते आणि त्याच्या वैद्यकीय परिस्थितीचा विचार केला जावा जेणेकरुन त्याला चालू सेमिस्टरसाठी पात्र होण्यासाठी क्रेडिट मिळू शकतील, अशी मागणी आता विद्यार्थी करताना दिसत आहेत.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून वर्ग थांबवले आहेत. 5 विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरी नसल्याने आणि हवे तितके क्रेडिट नसल्याने परीक्षा देता येणार नाही, असे सांगितले. नंतर शैक्षणिक परिषदेने 4 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी दिली. मात्र, एकाला पुढील वर्षी परीक्षा देण्यास सांगितले. त्यानंतर 2020 बॅचमधील सर्वच विद्यार्थ्यांनी वर्गात जाणे बंद केले आहे. 15 मेपासून 3 विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.
पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती
पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती