Saturday, April 27, 2024
Homeआंबेगावपुणे : SFI चे प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन 

पुणे : SFI चे प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन 

घोडेगाव : आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहांच्या विविध प्रश्नांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घोडेगाव प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

इयत्ता 8 ते 12 मध्ये विद्यार्थ्यांचे विद्यालय तसेच महाविद्यालय मध्ये प्रवेश झाला आहे. तसेच शाळा व महाविद्यालय चालू झालेले आहेत. इयत्ता 12 च्या विद्याथ्र्यांचे गेला महिनाभरापासून महाविद्यालय चालू झालेले आहेत. तसेच सर्व शाळा या 15 जून पासून सुरु झालेल्या आहेत. हे सर्व विद्यार्थी 25 ते 30 किमी रोजचा प्रवास करून शाळेला व कॉलेजला येत आहे. तसेच येण्या जाण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे. तसेच काही विद्यार्थ्यांची घरची असणारी आर्थिक परिस्थिती यामुळे विद्यार्थ्यांना येण्या – जाण्यासाठी जवळ पैसे देखील नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. असेही एसएफआयचे आंबेगाव तालुका अध्यक्ष दीपक वाळकोली म्हणाले.

तसेच 27 जून 2022 पर्यंत वसतिगृह प्रवेश देण्यात आला नाही, तर प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना बळवंत गायकवाड म्हणाले, सोमावर दिनांक 27 जून 2022 पासून वसतिगृहात प्रवेश दिला जाईल. तसे आदेश संबंधित वस्तीगृहाच्या गृहपालांना देण्यात असल्याचेही ते म्हणाले. तसेच प्रवेशास अडचण आल्यास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा असेही गायकवाड यांनी सांगितले.

एसएफआय च्या वतीने वसतिगृहाची वेबसाईट चालू करून इयत्ता 8 वी ते 13 वी चे प्रवेश तात्काळ सुरू करा. स्वयंम योजनेची स्थगित असलेली डीबीटी विद्यार्थ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करा. आदिवासी मुलांचे शासकीय बारव येथील पिण्याच्या पाण्याचा व अंघोळीच्या गरम पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवा. ITI च्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश द्या. मंचर, घोडेगाव मेस च्या प्रश्नही उपस्थित केला आहे.

निवेदन देतेवेळी एसएफआय आंबेगाव चे तालुका अध्यक्ष दिपक वाळकोली, जिल्हा कमिटी सदस्य प्रविण गवारी तसेच राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे पिलाजी शिंगाडे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय