Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याPune : लवकरच ग्रीन एनर्जीवर सर्व वाहने धावणार - रवी पंडीत

Pune : लवकरच ग्रीन एनर्जीवर सर्व वाहने धावणार – रवी पंडीत

पुणे/क्रांतीकुमार कडुलकर : पेट्रोल-डीझेल यासारख्या पारंपरिक इंधनामुळे निर्माण होणाऱ्या घाणेरड्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी नैसर्गिक इंधनावर कसे वाहने धावतील यासाठी तंत्रज्ञान विकसित करीत आहोत. भविष्यात ग्रीन एनर्जीवर सर्व वाहने धावणाऱ आहे. हे संशोधनाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. असे उदगार केपीआयटी टेक्नॉलॉजीस कंपनीचे अध्यक्ष रवी पंडीत यांनी काढले.

डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठान आकुर्डी संचलित इन्स्टिट्यूट फॉर कंप्युटींग ॲंड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या वतीने बोट क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रोकोजिया कंपनीचे संचालक श्यामकांत डुंबरे, आयएसीएसडीचे कार्यकारी संचालक डॉ. भरत चव्हाण पाटील, व्यवस्थापकीय संचालिका सुप्रिया चव्हाण पाटील, डीवायपीईआरएफचे संचालक डॉ.जे.जी पाटील, सल्लागार प्रा डी.आर करनुरे, व्यवस्थापकीय संचालक (गुणवत्ता) श्वेता चव्हाण पाटील, डीवायपीआयएमएसचे संचालक डॉ.कुलदीप चरक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संगणक तज्ञ डॉ.विजय भटकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. डॉ भटकर म्हणाले कि, सॉफ्टवेअर विकसित करण्याचे शिक्षण देवून विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये या इंस्टीट्यूटचे मोठे योगदान आहे.

यावेळी ट्रेसलिंक आयएनसी कंपनीला (व्यवसायिक कार्यक्षमता पुरस्कार), अकॉप्स सिस्टीमला (सायबर सुरक्षा), निटॉर इन्फोटेकला (एचआर पुरस्कार), टेकस्पियनला (उदयोन्मुख कंपनी पुरस्कार), क्रेडेंसा सोल्युशन्स डेटा ॲनालिसीस पुरस्कार) एक्सुसिया कंपनीला आयटी लीडरशिप पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी घेण्यात आलेल्या तांत्रिक चर्चासत्रात मंद्रीसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय किंकर, नेट एसपीआयचे जितेंद्र पाटील यांनी आपले अनुभव यावेळी सांगितले.
“कृत्रिम बुद्धीमत्ता आणि नोकरीची सुरक्षितता”या विषयावर झालेल्या चर्चासत्रात संजय पटवर्धन रोहिणी वाघ, निलेश देशमुख, मुकुंद मिश्रा, गौरव राठोड, संजय घारे, लोकेश कुमार यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुध्द पाठक यांनी तर आभार केशव कुमार यांनी मानले.

हेही वाचा :

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय