Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : सामाजिक कार्यकर्ते प्रशांत(लुकस)केदारी यांचा आदमी पार्टी मध्ये प्रवेश

Pune : सामाजिक कार्यकर्ते प्रशांत(लुकस)केदारी यांचा आदमी पार्टी मध्ये प्रवेश

शेकडो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश (Pune)

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : प्रशांत केदारी गेल्या २० वर्षांपासून वडगावशेरी मतदार संघ व संबंध महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, पुरोगामी विचार आणि मानवता वादी मूल्ये या विचारसरणीवर समाजातील वंचित व गरजू बांधवासाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे, परिषदा आयोजित केल्या आहेत. (Pune)

तसेच प्रशांत केदारी हे उच्चशिक्षित असून पुणे विद्यापीठातून त्यांनी एम बी ए केलेले आहे. वडगावशेरीत सामान्य माणसाने सामान्य माणसांना मूलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी, पूर नियंत्रण योजना, रहदारी व्यवस्थापन, सरकारी योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पराकष्टा करू असे प्रशांत केदारी यांनी प्रवेशाच्या वेळी सांगितले.

फेबियाणं सॅमसन यांनी हा प्रवेश घडवून आणला ते या प्रवेशाचे शिल्पकार ठरले आहेत. प्रशांत केदारी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. वडगाव शेरीत तुल्यबळ विधानसभा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाईल, तसेच त्यांची प्रतिमा देखील चांगली आहे.

यावेळी महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी अजित फाटके, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, मुकुंद किर्दात, डॉ. अभिजित मोरे, अमित म्हस्के, रिपब्लिकन नेते राहुल डंबाळे, मुस्लिम कॉन्फरेन्सचे हाजी झुबेर मेमन, ख्रिश्चन सोसायटीच्या प्रदेश महिला संघटक तेरेसा केदारी, आप शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, फुलचंद म्हस्के, प्रमोद पारधे, अविनाश भाकरे, सुनिता काळे, प्रिया जाधव, मेरी पारगे, तहसील देसाई, प्रिती निकाळजे, मनोज शेट्टी,मनोज फुलारे,शिवाजी डोलारे,मिलींद ओहोळ, माधुरी गायकवाड, संजय कोणे, शितल कांदिळकर, जितेंद सोनवणे, अनिता सॅमसन आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय