Pune : मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्यासह अन्य तिघांना पद्मभूषण केंद्रीय मंत्री राम विलास पासवान पुरस्कार जाहीर झाला आहे.
जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पथारी व्यावसायिक आणि लघु विक्रेत्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे यावेळी सदर पुरस्कार सोहळ्याचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.
मिलिंद गायकवाड, उमेश चव्हाण, प्रसिद्ध प्रकाशक ऍड. शैलजा मोळक, पत्रकार दीपक बिडकर आणि आदर्श शिक्षक सुरेश भंडारे यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे अध्यक्ष संजय अल्हाट यांनी दिली.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून ज्येष्ठ विचारवंत यादवराव तथा अंकल सोनवणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पथारी व्यावसायिकांसाठी संघटनेच्या स्थापनेपासून गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा देखील यावेळी घेण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार सोहळ्यास रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:00 वाजता आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील संस्थेच्या वतीने अध्यक्ष संजय आल्हाट यांनी केले.
Pune
हेही वाचा :
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर
चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा