Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याPUNE:सरकारने मातंग समाजासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची घोषणा केल्याबद्दल जल्लोष

PUNE:सरकारने मातंग समाजासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची घोषणा केल्याबद्दल जल्लोष

पुणे /क्रांतिकुमार कडुलकर:दि.27-मातंग समाजातील अनेक वर्षापासूनची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः शैक्षणिक विकासासाठी बार्टीच्या धर्तीवरआर्टी (अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था)ची स्थापना व्हावी,ही मागणी मागील बऱ्याच वर्षापासून मातंग समाज करत होता.
आज ती मागणी शासनाने मान्य केली असून येणाऱ्या काळामध्ये आर्टी ची स्थापना करण्यात येईल.अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडत असताना घोषणा केली आहे.

ही घोषणा मातंग समाजाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची ठरणारी असून मातंग समाजातील विशेषतः शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते निश्चितपणे या घोषणेने सुखवणार आहेत.म्हणून आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नेतृत्त्वात आज पुण्यात मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंददोत्सव साजरा केला.

यावेळी क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे,रवी आरडे,माजी नगरसेवक शांतिलाल मिसाळ,भास्कर नेटके,निलेश वाघमारे,अण्णा धगाटे यासह पुणे शहरातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय