पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : कोविड काळानंतर जगभरात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे जी एन एम नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जर्मनीमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. PUNE
याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी (दि ७ जुलै) मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जतन फाउंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी दिली.
महाराष्ट्रात जी एन एम या कोर्सला अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे या कोर्सला या प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले जातात. या प्रवर्गातील प्रशिक्षित तरुण तरुणींना जर्मनी मध्ये काम मिळवून देण्यासाठी जतन फाऊंडेशन यांनी करार केला असून मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध आहे. Pune news
याचबरोबर कोणत्याही शाखेत १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी नर्सिंगचा अभ्यासक्रम अप्रेंटिसशीप पद्धतीने कमवा आणि शिका अशा योजनेतही जर्मनीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
रविवारी (दि. ७ रोजी ) दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत नवी पेठेतील एम. एम. जोशी फाउंडेशनमध्ये हे सेमिनार होणार आहे. जतन फाऊंडेशन आणि फिनकॉम एड्युव्हेंचर्स यांच्यावतीन या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
जी एन एम , बी एस सी (नर्सिंग), पी बी एस सी , एम एस सी (नर्सिंग), हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
सेमिनार मध्ये जर्मनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी, विसा, परमनंट रेसिडेन्सी , पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम आणि जर्मनीतील कामगार कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
रवींद्र झेंडे, जतन फाऊंडेशन, पुणे
मो-9890112868
हेही वाचा :
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद