Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सूविधा उपलब्ध

Pune : बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सूविधा उपलब्ध

बारामती / वर्षा चव्हाण : बारामती विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Pune)

मतदारसंघात एकूण 219 मतदार घरुन मतदान करणार आहेत, त्यापैकी 170 मतदार हे 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तर तर 49 दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 9 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

याकरिता एकूण 11 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून पथकांमध्ये पथक प्रमुख म्हणून क्षेत्रीय (झोनल) अधिकारी, मतदान अधिकारी म्हणून मंडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune)

त्यांच्यासोबत एक पोलीस, सूक्ष्म निरीक्षक आणि छायाचित्रकार असणार आहे. मतदाराच्या घरी बूथ स्थापन करुन गोपनीयतेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेऊन त्यांच्याकडून मतदान करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय