पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता दिलेली मुदत वाढविले आहे. आता २२ मे पर्यंत विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेतल्या नाहीत. हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जो निर्णय घेईल. त्या अनुषंगाने स्थायी समितीची मान्यता घेऊन, या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या शिष्यवृत्ती बद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या वतीने इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना अंतर्गत विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. यंदादेखील याकरिता ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी dbt.dpune corporation.org या संकेत स्थळावर अर्ज करावा.
पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावी मध्ये ८० टक्के गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तसेच ७० टक्के गुण मिळवलेल्या पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी मागासवर्गीय ६५ टक्के गुण मिळविणारे तथापि ४० टक्के अपंगत्व असलेले विद्यार्थी यांना १५ हजार रुपये दिले जातात. तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी २५ हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
मागील शिष्यवृत्ती वाटप
वर्ष दहावी बारावी कोटी
२०१७/१८ ७११६ २४९२ २१.००
२०१८/१९ ८६६९ ३४८७ २१.२०
२०१९/२० ६०२० २४२० १५.८
२०२०/२१ ७५२६ २६४० १७.८८