Thursday, November 21, 2024
Homeजिल्हामहागाई आणि बेरोजगारी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

महागाई आणि बेरोजगारी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने


पिंपरी चिंचवड
 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाच्या भरमसाट भाववाढीच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलाच्या किंमती भरमसाट वाढवून ठेवल्या असून केंद्र सरकार आणि त्यांचे मंत्री या महागाईवर व शेतकरी कामगार यांच्या जगण्याच्या प्रश्नावर काहीही बोलत नाही. उलट कामगार विरोधी कायदे, शेतकरी विरोधी कायदे करून सर्व सामान्य माणसाच्या जखमवेवर मीट चोळाचे काम करत असल्याची टिका ही यावेळी करण्यात आली.

यावेळी माकपचे जिल्हा सचिव गणेश दराडे, डॉ.किशोर खिलारे, सचिन देसाई, अपर्णा दराडे, अमीन शेख, सुषमा इंगोले, शिवराज अवलोल, बाळासाहेब गस्ते, जॉर्ज, संगीता देवळे, आशा बर्डे, ज्योती मुलमुळे, अंजली होंडे, माधवी शोनी, आम्रपाली पैकराव, पलवी अंबुरे, सुरेखा विध्यागर, विमल जाधव, वसुधा शिंदे, विरभद्रा स्वामी, भागीरथी अबुज, विजया साळवी, लक्ष्मी जंगले, मंगल सूर्यवंशी, अनिता शेरकर मंजूला कटेमणी, देविदास जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड अंतर्गत मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

रयत शिक्षण संस्था, सातारा येथे 107 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 2 जून 2022 रोजी मुलाखत

एसटी बस चे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढ !


संबंधित लेख

लोकप्रिय