Friday, May 17, 2024
HomeNewsआज पिंपरीत राज्यपालांविरोधात निषेध आंदोलन

आज पिंपरीत राज्यपालांविरोधात निषेध आंदोलन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने मंगळवार दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी सायंकाळी ०५:०० वाजता आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांषू त्रिवेदी तसेच भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात “निषेध आंदोलन” करण्यात येणार आहे.

सदर आंदोलनास आपले प्रतिनिधी छायाचित्रकार पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.

Lic
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय