Thursday, May 9, 2024
Homeजिल्हा"आशा" कार्यकर्तीवर झालेल्या विनयभंगाचा निषेध – कठोर कारवाई करण्याची मागणी

“आशा” कार्यकर्तीवर झालेल्या विनयभंगाचा निषेध – कठोर कारवाई करण्याची मागणी

नाशिक : “आशा” कार्यकर्तीवर झालेल्या विनयभंगाचा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) चे राजू देसले यांनी निषेध करत कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांच्याद्वारे करण्यात आली आहे.

देसले म्हणाले, शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने आशा कर्मचारीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अायटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना तीव्र निषेध करीत आहे. त्वरीत आरोपीवर कठोर कारवाई जलद न्यायालयात करावी अशी मागणी करीत आहोत, असेही ते म्हणाले.

तसेच आरोग्य विभागात कार्यरत आशा व गटप्रर्तक यांच्या कामाची दखल जागतिक पातळीवर आरोग्य संघटनेने घेतली असून कोराना कामाचा गौरव केला आहे. मात्र, अल्प मानधनावर कार्यरत आशांना व गटप्रवर्तक ना सन्मानाची वागणूक आरोग्य विभागात मिळत नाही. यासाठी लक्ष दयावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे महिलांसाठी असलेल्या “विशाखा समिती ‘ ची स्थापना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय