Thursday, September 19, 2024
Homeग्रामीणबुद्ध पौर्णिमेनिमित्त युवा धम्म अभ्यासक प्रथमेश देसाई यांचे तरुणांना मार्गदर्शन !

बुद्ध पौर्णिमेनिमित्त युवा धम्म अभ्यासक प्रथमेश देसाई यांचे तरुणांना मार्गदर्शन !

गगनबावडा :  प्रस्थापितांनी समाजावर लादलेली अन्यायकारक बंधने झुगारून त्याही काळात गौतम बुद्धांनी समतेचा संदेश दिला .त्यांची त्यागी वृत्ती जगमान्य आहे. आजच्या समाजाला त्यांचे विचार दिशादर्शक आहेत .त्यांचे विचार आत्मसात करावेत असे आवाहन युवा धम्म अभ्यासक प्रथमेश देसाई यांनी केले. बावेली तालुका गगनबावडा येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार बावेलीकर यांनी केले .महिला व युवकांनी गावात राबविलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला .त्या वेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, माजी सरपंच तायप्पा कांबळे ,मोहन कांबळे, युवराज कांबळे ,राहुल कांबळे इत्यादींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रवीण कांबळे यांनी मानले.

कंगना रणौतचा बिग बजेट ‘धाकड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला !

विशेष लेख : जागतिक चहा दिवस !

हिचा माज असाच राहणार” ! प्राजक्ता माळी

संबंधित लेख

लोकप्रिय