Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPradhan Mantri Awas Yojana : घरकुलाची रक्कम साडेतीन लाखापर्यंत वाढवून मिळावी, ट्रायबल...

Pradhan Mantri Awas Yojana : घरकुलाची रक्कम साडेतीन लाखापर्यंत वाढवून मिळावी, ट्रायबल फोरमची मागणी

शिरपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) मिळणाऱ्या घरकुलाची रक्कम ही सद्यस्थिती पाहता फारच कमी आहे. ही घरकुलाची रक्कम तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी वाढवून द्यावी अशी मागणी ट्रायबल फोरम धुळे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वतःच्या हक्काच्या घरात राहता यावे याकरिता भारत सरकारकडून पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व इतर घरकुल योजना राबविण्यात येतात.

सध्यस्थितीत पंतप्रधान आवास योजनेचा (Pradhan Mantri Awas Yojana) लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र या योजनेसाठी शासनाकडून मिळणा-या निधीची रक्कम अत्यंत कमी आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक वस्तूचे व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये घर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, विटा, वाळू, लोखंड, गज, मजुरी तसेच मिस्त्रीची मजुरी इत्यादींचे भाव प्रचंड वाढले आहेत. या प्रचंड वाढत्या महागाईमुळे तो लाभार्थी आपले घर शासनाच्या अल्पशा कमी अनुदानात बांधू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनुदान समसमान देण्यात यावे. 

असे आहे घरकुल अनुदान (Pradhan Mantri Awas Yojana) ?

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलाला ग्रामपंचायत स्तरावर १ लाख २० हजार रुपये अनुदान आहे तर शहरी भागातील नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना २ लाख ५० हजार रुपये आहे. या रक्कमेमध्ये वाढती महागाई लक्षात घेता कुठल्याही प्रकारे घराचे बांधकाम पूर्ण होत नाही.

“भारत सरकारने सन २०१५ पासून योजना सुरु केली आहे. नऊ वर्षात बांधकाम वस्तू व साहित्यांच्या किंमती प्रचंड वाढल्या परंतू अनुदानात मात्र वाढ करण्यात आली नाही. गरीबांच्या घरकुलाचे अल्पशा अनुदानात बांधकाम होत नाही. त्यामुळे अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

– मोगेश पावरा जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम धुळे

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात जोरदार आंदोलन, उपमुख्यमंत्र्याकडून कामाला स्थगिती

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

संबंधित लेख

लोकप्रिय