Thursday, August 11, 2022
Homeशिक्षण9 ऑगस्ट रोजीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकला अन्यथा बहिष्कार करू; बिरसा फायटर्स...

9 ऑगस्ट रोजीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकला अन्यथा बहिष्कार करू; बिरसा फायटर्स ची मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

रत्नागिरी : 9 ऑगस्ट 2021 रोजीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करा अथवा परीक्षा तारीख पुढे ढकला अन्यथा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणेचा आम्ही जाहीर निषेध व बहिष्कार करू, अशी मागणी सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कडे दिनांक 28 जुलै 2021 रोजीच्या निवेदनाद्वारे केली आहे. 

          

निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 27 जुलै 2021 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे आयुक्त तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 8 जुलै व 9 जुलै 2021 या दिवशी इयत्ता 5 वी व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्याचे प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींच्या सन्मानार्थ 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. त्याप्रमाणे देशभरात व महाराष्ट्रात 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिवसाची सार्वजनिक शासकीय  सुट्टी आहे. आदिवासी दिनानिमित्त राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात आदिवासी सांस्कृतिक देखावे, रॅली, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकारासाठी आंदोलन व मोर्चा काढले  जातात.

              

आदिवासी समाजाची अस्मिता, अस्तित्व, स्वाभिमान, संस्कृतीची ओळख, हक्क व अधिकाराची ओळख होऊन कर्तव्याची जाणीव होण्यासाठी, सामाजिक ऐक्य, सलोखा, विविधतेत एकता टिकून राहावी तसेच आदिवासींचे जल, जंगल, जमीन यातील अस्तित्व , सार्वभौमत्व टिकून राहावे, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी हा दिवस धूकधडाक्यात साजरा केला जातो. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात आदिवासी अधिकारी, शिक्षक  कर्मचारी व विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने सामिल होऊन दिन साजरा करतात. 

मात्र आपण काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामुळे 9 ऑगस्ट 2021 जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्यास आमचे अनेक आदिवासी कर्मचारी  बांधव व विद्यार्थी यांना जागतिक आदिवासी दिवस कार्यक्रमात सामिल होता येणार नाही. परिणामी आदिवासी दिन  साजरा न करता आल्यामुळे या दिवसाचा आनंद घेता येणार नाही. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवसाची  महाराष्ट्रभर सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करा, अशी बिरसा फायटर्स ने केली आहे.

महाराष्ट्रात 10% आदिवासी लोकसंख्या आहे. आदिवासी समाजात हा जागतिक आदिवासी दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणून 9 ऑगस्ट 2021 रोजीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात यावी अथवा परीक्षा तारीख  पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा परीक्षा परिषदेचा निषेध व बहिष्कार करू, असा इशारा दिला आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय