जुन्नर (रफिक शेख) : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या अनुषंगाने रविवारी शहरात पोलिसांच्या पथ संचालनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागात पथ संचालन केल्यानंतर जुन्नर पोलिस ठाणे येथे या संचालनाचा समारोप करण्यात आला.
आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण २९ जून या एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्वभुमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीकोनातून जुन्नर शहरात पोलीस पथ संचलन करण्यात आले आहे. जुन्नर शहरातील रविवार पेठ, कागदी वाडा आणि पीरजादेवांडा जमादार चौक नगरपालिका चौक छत्रपती शिवाजी महाराज पंचलिंग चौक धन्यबाजार पोलीस स्टेशन असे जवळजवळ पाच किलोमीटरचे पथ संंचालन करण्यात आले आहे.
या संचलनासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, पोलीस निरिक्षक नारायण पवार, चार पीएसआय, पोलीस स्टेशनचे १५ पोलीस तसेच एसआरपीएफ आणि आरसीपीचे जवान पथ संचलनासाठी हजर होते.
हे ही वाचा :
परदेशात शिक्षण घ्यायची इच्छा आहे? वाचा ‘या’ आहेत शिष्यवृत्ती योजना
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती
रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती