यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे वित्तीय साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: दि. १४ : विद्यार्थ्यानी वित्तीय साक्षरतेचे महत्व विद्यार्थी दशेत असतानाच जाणून घेणे गरजेचे आहे, असे मत फिंटोपीडिया संस्थेचे मुख्य धोरण अधिकारी अंकित मेहता यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे आयोजित वित्तीय साक्षरता या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (PCMC)
वित्तीय साक्षरता, वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन, भविष्यकालीन उद्दिष्टपूर्तीसाठी आर्थिक नियोजन, कर्ज व्यवस्थापन, आर्थिक स्वयंशिस्त याबाबींचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन मेहता यांनी व्याख्यानात केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी म्युच्यअल फंड, विमा, शेअर, शैक्षणिक कर्ज आदींबाबत विचारलेल्या प्रश्नांना मेहता यांनी विविध उदाहरणांसह समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी कार्यक्रमाला आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्यासह एमबीए, एमसीए, बीबीए व बीसीए विद्याशाखेचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. गंगाधर डुकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. (PCMC)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मधुरा देशपांडे यांनी , तर सूत्रसंचालन खुशी चोरडिया व आभार प्रदर्शन संस्कृती कांबळे यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क
योगेश रांगणेकर
जनसंपर्क प्रमुख : मोबा : 7350014536 / 9325509870
ज्ञानेश्वर गोफण (माऊली)
मोबा : 7083474883 / 7620603256
हेही वाचा :
मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव
रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य