Police Recruitment 2024 : महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदासाठीची भरती प्रक्रिया गेल्या 5 तारखेपासून प्रारंभ झाली असून, येत्या 30 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत आहे. परंतु, नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत. Police Bharti
शासनाच्या गृहविभागाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई (Police Bharti) पदाच्या भरतीची प्रक्रिया गेल्या 5 तारखेपासून प्रारंभ झाली आहे. त्यानुसार, इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रामीण, शहरी, कारागृह, लोहमार्ग पोलिस दलांतील भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. 30 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी ऑनलाईन सादर करावयाचे आहेत.
दरम्यान, नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहितेमुळे पोलिस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त राहणार आहेत. यामुळे पोलिस भरतीसाठीच्या (Police Bharti) पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी पोलीसांकडे मनुष्यबळाची कमतरता राहणार आहे. यामुळे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतरच्या पोलीस भरतीच्या पुढील नियोजनाबाबतचे नियोजन अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले नाही.
त्यामुळे जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरती प्रक्रियेचे नियोजन केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काहीही जारी केलेले नसले तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर तशी सूचना जारी होण्याची शक्यता आहे.
उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळणार!
एप्रिल, मे आणि जून महिन्याचे दोन आठवडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे असणार आहेत. त्यामुळे या काळात पोलीस भरतीची प्रक्रिया होण्याची चिन्हे जवळपास नाहीच. परिणामी, इच्छुक उमेदवारांना लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याकरिता जवळपास अडीच महिन्यांचा जादा अवधी मिळणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जूननंतरच भरतीच्या नियोजनाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती
Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती
EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती
Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
BAVMC : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती
Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती
NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती