Sunday, May 19, 2024
Homeराज्यपिंपरी : आकुर्डीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

पिंपरी : आकुर्डीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

पिंपरी (पुणे): श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यावेळी अजित अभ्यंकर, डॉ.सुरेश बेरी, अनिल रोहम, गणेश दराडे, अपर्णा दराडे, अमिन शेख, मनीषा सपकाळे, सूर्यकांत वेताळ, रिया सागवेकर, शेहनाज शेख सह विदयार्थी युवक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

“भारताला ब्रिटिश राजवटीतील जोखडापासून मुक्त करण्यासाठी नेताजींनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. आशिया खंडातील ते एकमेव अलौकिक महापुरुष होते. युवाशक्तीला शिस्तबद्ध लढाईसाठी त्यांनी प्रेरणा दिली होती.जगाच्या इतिहासातील मानवमुक्ती लढ्यात आझाद हिंद सेनेचे नाव अजरामजर आहे. कामगार शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या नव्या लढाईसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराने चळवळ चालवली पाहिजे, असे मत कैलास कदम यांनी व्यक्त केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय