पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्रातील सर्व नद्यांचे स्वच्छता काम अभियान व खणा नारळाने साडीचोळीने ओटी भरून संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, शेतकरी व पशुधनास मुबलक पिण्याचे पाणी मिळावे. पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे, यासाठी राजे शिवाजीनगर, चिखली प्राधिकरण येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने चिखली मोई येथील घाट, आळंदी, देहू येथे इंद्रायणी व होळकर घाट पवना नदी येथे जलपूजन करून प्रतिकात्मक गंगा पूजन करण्यात आले.
यावेळी सेवेकरी महिलांनी दोन्ही नद्यांची खणा,नारळाने ओटी भरून पर्यावरण संवर्धनासाठी प्रार्थना केली. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णा मोरे युवा मार्गदर्शक चंद्रकांत मोरे,पुणे जिल्हा संचालक सतीश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ येथे गंगापूजन करण्यात आले. सोनाली बिरले, मंगला नेहते, सोनाली जमदाडे, मेघा पोळ, गौरी जमदाडे, प्रितेश जमदाडे, महेश पोळ, मयूर पोळ, यश बिरले आदी सेवेकाऱ्यांनी गंगा पूजन केले.