Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी तर्फे फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना मास्क आणि...

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी तर्फे फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी चिंचवड विधानसभा कडून कोरोना काळा मध्ये फ्रंट लाइन कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यात सफाई कामगार, पोलिस कर्मचारी, आणि रिक्षा चालक सामील होते. हा कार्यक्रम किवले, विकास नगर व मुकाई चौक येथे पार पडला. सामान्य लोकांचे हित लक्षात ठेवून आम आदमी पार्टी ने हा उपक्रम राबविला.

 

कोरोना काळामध्ये सफाई कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवतात. तसेच पोलीस कर्मचारी शहराची 24 तास सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद असतानाही सामन्य नागरिकांना सेवा देणारे आपले रिक्षा चालक आणि त्यांच्या परिवाराची काळजी म्हणून यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टी चे पदाधिकारी चिंचवड विधान सभेचे अध्यक्ष सागर सोनवणे, शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, महिला कार्यकर्ता तेजस्विनी मॅडम आणि पिंपरी चिंचवड शहर सचिव राघवेंद्र राव उपस्थित होते. 

महेश बिराजदार, सागर सोनवणे यांनी महिला कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाची योजनेसाठी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच रिक्षा चालक व बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकी रुपये ५,००० साठी आयुक्ताकडे मागणी केलेली आहे. जर मागणी मान्य झाली तर त्याचा फायदा या कामगार वर्गांना मिळवून देण्याच्या प्रयत्न करू, असे आश्वासन आप कडून देण्यात आले.


संबंधित लेख

लोकप्रिय