Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयफ्रान्सच्या प्रसिद्ध विद्यापीठातून पीएचडी ; असीम क्षीरसागर यांचे उत्तुंग यश अभिमानास्पद !

फ्रान्सच्या प्रसिद्ध विद्यापीठातून पीएचडी ; असीम क्षीरसागर यांचे उत्तुंग यश अभिमानास्पद !

परभणी : परभणीत मराठी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन उच्च शिक्षणातील क्षितिजे  आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गाठणाऱ्या असीम क्षीरसागर यांचे उत्तुंग यश अभिमानास्पद ठरले आहे. ग्रेनोबल(फ्रान्स) या नावाजलेल्या विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातील मटेरिअल सायन्सशी निगडीत डेन्सिटी फंक्शन थिअरी आधारे मेटल ऑक्साइड फ्रेमवर्क व वायू यातील संबंध या विषयीच्या शोध निबंधाआधारे असीम यास नुकतीच डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. 

दरम्यान असीम यांच्या ४ शोध निबंधांना आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयीच्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करून मान्यता देण्यात आली आहे. याच बरोबर लक्झेम्बर्ग विद्यापीठात वरिष्ठ संशोधनासाठी असीम यांची निवड  झाली आहे. श्रमिकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या राजन व माधुरी क्षीरसागर या दांपत्याचे असीम हे सुपुत्र आहेत.

मराठवाडा हायस्कूल येथे मराठी शाळेत असीम यांचे शिक्षण झाले. १२ वी मध्ये आयआयटी जेईई परीक्षेच्या मेरिटमध्ये येवून आयसर (IISER) पुणे येथे बीएस-एमएस कोर्स पूर्ण केला. या दरम्यान एमएसच्या अंतिम वर्षात भारतरत्न सीएनआर राव संचालक असलेल्या जवाहरलाल नेहरू वैज्ञानिक  संशोधन व प्रगत अध्ययन केंद्र (JNCASR) बंगळूर येथे वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची संधी मिळाली होती. पीएचडी पदवी प्रदान करताना परीक्षक मंडळाने   असीम यांच्या संशोधन कार्याबद्दल मनःपूर्वक कौतुक केले. ग्रेनोबल विद्यापीठातील रॉबर्टा (संशोधक मार्गदर्शिका) यांनी शुभेच्छा दिल्या. असीमच्या या उत्तुंग कर्तृत्वाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे आई – वडील कॉ. राजन व माधुरी क्षीरसागर यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय