Saturday, May 4, 2024
Homeकृषीभात पिकावरील किड - रोग व्यवस्थापन कसे कराल ? वाचा सविस्तर

भात पिकावरील किड – रोग व्यवस्थापन कसे कराल ? वाचा सविस्तर

भात पिकावरील किड – रोग नियंत्रणासाठी खालील औषधांची फवारणी करावी.

१. करपा – 

● कार्बेन्डझिम ५० टक्के – १० ग्राम.

● हेक्झकोनझोल ५ इसी – २० मिली.  

● ट्ब्युकोण्याझोल २५.९ इसी. – १५ मिली. 

● ट्रायसायकलेझोल ७५ डब्लूपी – ६ ग्राम.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२. कडा करपा –  या रोगाच्या नियंत्रणासाठी खालील औषधांची फवारणी करावी.

● कॉपर ओक्सी क्लोराईड ५० टक्के – २५ ग्राम. 

● कॉपरहाइड्रो साईड ५३.८ टक्के ३० ग्राम.

● त्रेपटो सायकलीन – अर्धा ग्राम.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारावी

३. पानावरील तपकीरी ठिपके – 

● कॉपर हायड्रोसाईड ५३.८ टक्के – ३० ग्राम.

● कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के – २५ ग्राम.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४. आभासमय काजळी उर्फ कान्ही – (पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना) 

● कॉपर हायड्रॉसायड ७७ टक्के – २५ ग्राम.

● कॉपरऑक्सीक्लोराईड ५० टक्के – २५ ग्राम.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५. पर्णकोष करपा –

● टेब्युकॉनाझोल २५.९ इसी. – १५ मिली.

● प्रापिकाँझोल २५ इसी. – १० मिली 

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

६. भात पिकावरील गादमशी / खोडकिडा – याच्या नियंत्रणासाठी एकरी 

● फोरेट १० जी. – ८-१० किलो.

● करबोफुरोन ३ जी. – ७-८ किलो

● कारटाफ हायड्रो क्लोराईड ४ जी. 

– ८-१० किलो रेतीत मिसळवून द्यावे.

■ रासायनिक पध्दती – खोडकिड्यासाठी फवारणी करायची असल्यास – 

● क्वीनोलफॉस २५ टक्के – ३२ मिली.

● क्लोरोपायरीफोस २० टक्के –  ४० मिली.

पाण्यात मिसळवून फवारणी करावी.

■ जैविक पध्दती – खोडकिडा नियंत्रणासाठी – 

● फेरोमेन ट्रॅप एकरी ८-१० लावावे. तसेच ‘ट्रायकॉग्रामा‘ या परोपजीवी किटकाचे (ट्रायकोकार्ड) २०००० – २५०००० अंडी ७ दिवसाच्या अंतराने ३ – ४ वेळा शेतात लावावे. कार्ड लावल्यानंतर ७ – १० दिवस रासायनिक कीडनाशकांची फवारणी करू नये. यामुळे खोड किडीचे नियंत्रण होवून अप्रत्यक्षपणे इतरही किडीचे नियंत्रण होते. कारण मित्रकिडीच्या संख्येत वाढ होते.

७. लष्करी अळी –

● सायपरमेत्रिन १० टक्के – ६ मिली. 

● डायक्लोरोवोस ७६ इसी. – १४ मिली.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

८. पाने गुंडाळणारी अळी –

● मेल्याथियोन ५० टक्के – ३० मिली.

●  ट्रायझोफोस ३५ टक्के अधिक 

● डेल्टामेथरिन १ टक्के – १५ -२० मिली.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

९. तुडतुडे  

● पाण्याची सोय असल्यास ५-७ दिवसांनी पाणी बाहेर सोडावे.

● इमिडाक्लोरोपिड १७.८ एसएल. – २_३ मिली. 

● एसीफेट – १४-१७ मिली.  

● मेल्याथिओन ५० टक्के – २० मिली.

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

औषधाची फवारणी करताय ? मग हे करा.

● दोन किंवा अधिक किडनाशके एकात मिसळून फवारणी करु नये.

● किडनाशकाचा सांगितलेल्या प्रमाणातच वापर करा.

● किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याचा अंदाज घेऊन प्रथम वनस्पतीजन्य किंवा निमआधारित कीडनाशकांची फवारणी करावी.

● कीडनाशकासोबत रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके, अथवा जैविक खते मिसळून करून फवारणी नये.

● फवारणी करिता स्वच्छ पाण्याचा वापर करा.

● किडीचे परिणामकारक नियंत्रण करण्यासाठी पहिल्या फवारणी नंतर ७ – ८ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

● वारंवार तेच किडनाशक फवारणी करु नये.

● किडी अमावश्याच्या रात्री अंडी घालत असल्यामुळे ३ – ४ दिवस अगोदर फवारणी केल्यास अधिक परिणामकारक ठरते.

● तणनाशक फवारणी केलेला पंप स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय कीडनाशक फवारणी करू नये.

औषध फवारणी करताना स्वत : ही काळजी घ्या !

● तोंडाला मास्क वापरा किंवा रुमालाने तोंड बांधून घ्या.

● हातामध्ये हातमौजे घाला किंवा, हात पुर्ण झाकले जातील असे कापडे घाला.

● डोळ्यांवर गँगल घाला.

● फवारणी केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ करा. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय