Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोनासंचारबंदीत उद्योग सुरू ठेवण्यास अटी व शर्तींच्या अधीन परवानगी - पालकमंत्री...

संचारबंदीत उद्योग सुरू ठेवण्यास अटी व शर्तींच्या अधीन परवानगी – पालकमंत्री सुभाष देसाई



औरंगाबाद :- जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  १० ते १८ जुलै २०२० दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली असून या कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी व शर्तींच्या अधीन परवानगी असणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले. शासनाचे जे उद्योगाबाबतचे धोरण आहे, त्याला अनुसरून त्यांनी वरील प्रमाणे जिल्हा प्रशासनास निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील संचारबंदी अंमलबजावणी बाबत सूचना देतांना पालकमंत्री  देसाई यांनी उद्योग क्षेत्र सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानुसार जिल्ह्यात  औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार चालु राहणार व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून या पुर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला 

     परवानगी असून चिकलठाणा, वाळुज, रेल्वे स्टेशन एमआयडीसी व औरंगाबाद शहरा व्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील उद्योग चालु राहणार आहेत. जे उद्योग समुह कामगारांची १० दिवस फॅक्टरी मध्ये निवास व्यवस्था करणार आहे, त्यांना उद्योग चालु ठेवण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगही चालु राहणार.औद्योगिक क्षेत्रा नजिकच्या खेड्यांमधील कामगारांची वाहतुक कार किंवा निश्चित बस ने सुरु राहणार आहे. आरोग्याबरोबरच अर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री  देसाई यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय