Sunday, May 19, 2024
Homeराज्यराज्यातील प्राध्यापकांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरा; सुटाच्या वतीने उच्च व तंत्र...

राज्यातील प्राध्यापकांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरा; सुटाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आश्वासित

कोल्हापूर :  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे कोल्हापूर दौरावर असताना सुटा संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध मागण्याच्या पूर्ततेसाठीचे निवेदन देण्यात आले.

एम.फुकटो च्या झालेल्या अंतिम बैठकीच्या निर्णयानुसार सुटाने यासाठी अगोदरच नियोजन करून प्राध्यापकांच्या मागण्या कशा फलदायी होतील याचा प्रयत्न केला आहे. सुटाने दिलेल्या निवेदनात प्रमुख मागणीमधील ७१ दिवसाच्या थकित वेतनाबाबतची मंत्री सामंत यांचेशी चर्चा करून मांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे, अशा प्रकारच सकारात्मक प्रतिसाद उदय सामंत यांनी दिला. 

त्याचबरोबर राज्यातील प्राध्यापकांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरा, नेट सेट मुक्त प्राध्यापकांना नेमणूक तारखेपासून कॅस व पेन्शनचे लाभ द्यावेत, प्राध्यापकांच्या एम. फील. व पीएच. डी..च्या वेतन वाढ पूर्वी प्रमाणे देण्यात यावेत,  जुनी पेन्शन योजना लागू करा, सन २०१ ९ -२०२० मध्ये सेवेत असणाऱ्या सर्व तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाना शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी सरसकट सर्वाना नेमणुकी ऑर्डर व वेतन वेळेत देण्यात यावेत, अशा सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

यावर बोलताना सामंत म्हणाले की, लवकरच या बाबत सरकार निर्णय घेणार आहे, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशा प्रकारे त्यांनी सूचित केले.

यावेळी सुटाचे कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील, सहकार्यवाह प्रा.डॉ. सुभाष जाधव, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रा. अरुण पाटील, नूतन कार्यवाह प्रा. डॉ. डी. आर. भोसले हे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय