Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:ज्येष्ठ नागरीकांसाठी 'सत्यशोधक'चा विशेष खेळ

PCMC:ज्येष्ठ नागरीकांसाठी ‘सत्यशोधक’चा विशेष खेळ

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवनचरित्र तसेच त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत ह्या उद्देशाने दि.१०/०१/२०४ रोजी ‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. वाकड तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील २२५ बंधूभगिनिंना अक्षयदादा कळमकर मित्र परीवाराच्या वतीने चिंचवड आयनाॅक्स येथे आयोजित करण्यात आला.या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या चित्रपटाचे निर्माते आप्पासाहेब बोराटे,प्रविण तायडे,बाळासाहेब बांगर,चित्रपटाचे कलाकार प्रविण तायडे,आयोजक अक्षय कळमकर,महात्मा जोतीबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी व त्यांचे मंडळातील सहकारी तसेच ह.भ.प शेखरमहाराज जांभुळकर,ह.भ.प महादेव महाराज भुजबळ,आनंद जेष्ठ नागरीक संघ वाकड आणि अक्षयदादा कळमकर मित्र परीवार उपस्थित होते.’महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्राबाई फुले यांनी समाजातील चुकीच्या परंपरांना झुगारुन समाजाच्या रोषाला न घाबरता आपले आयुष्य तळागाळाती लोकांच्या कल्याणासाठी कसे खर्च केले हा त्यांचा संघर्षमय प्रवास जर जाणुन घ्यायचा असेल तर हा चित्रपट सर्वांनी जरुर पहावा असे प्रतिपादन अक्षय कळमकर यांनी केले.शेखर जांभूळकर आणि महादेव भुजबळ यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय