Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआनंदाचा शिधा दोन वेळा,श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा,शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारचा निर्णय

आनंदाचा शिधा दोन वेळा,श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा,शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारचा निर्णय

मुंबई:श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (२२ जानेवारी) तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

राज्य सरकारच्या वतीनं गुढी पाडवा, गणेशोत्सव व दिवाळी अशा सणांनिमित्त रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो. अवघ्या शंभर रुपयांत या जिन्नस गरजूंना दिल्या जातात. आता हा शिधा आणखी दोन दिवस दिला जाणार आहे. अर्थात, राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं मिळणारा शिधा हा प्रत्येक वर्षी मिळेल का हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी देण्यात आली.या वितरणाकरीता येणाऱ्या ५४९.८६ कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय