Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:रेल्वे पायाभूत सुविधांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल – शंकर जगताप

PCMC:रेल्वे पायाभूत सुविधांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल – शंकर जगताप

अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत चिंचवड रेल्वे स्थानकाच्या रु. 20.44 कोटींच्या पुर्नविकासाच्या कामांचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उदघाटन
 

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे.या योजनेतून रेल्वे स्टेशन आधुनिक सुविधांनी युक्त होतील आणि प्रवाशांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळेल.या योजनेमुळे देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीच्या हस्ते देशभरातील 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास,1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यात आले.या योजनेच्या अंतर्गत पुणे मंडलाच्या चिंचवड रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. एकू 20.44 कोटींच्या पुर्नविकासाच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झाले.त्यावेळी शहरवासियांना शुभेच्छा देतांना चिंचवड रेल्वे स्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात शंकर जगताप बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे,भाजपचे मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे,पुणे मंडलाच्या प्रबंधक इंदू दुबे,प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी,प्रवक्ते राजू दुर्गे,भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके,अजय पाताडे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे,चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे,माजी उपमहापौर केशव घोळवे,नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेविका मीना कुलकर्णी,आरती चोंधे, सविता खुळे,बेटी बचाव बेटी पढाओ संयोजिका प्रीती कामतिकर,मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर,संतोष तापकीर,योगेश चिंचवडे,दीपक भोंडवे,सिद्धेश्वर बारणे,शेखर चिंचवडे,देवदत्त लांडे, सांस्कृतिक आघाडी संयोजक विजय भिसे,मधुकर बच्चे,राजश्री जायभाय, प्काश जवळकर,निता कुशारे,सचिन काळभोर,बाळासाहेब भूंबे,रवींद्र नांदुरकर,पल्लवी मारकड,पल्लवी पाठक,पल्लवी कोल्हापुरे,सज्जाद तांबोळी, मनिषा शिंदे आदी पदाधिकारी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.


यावेळी विकसित भारत आणि विकसित रेल्वे या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.सदर देशभरात २ हजारहून अधिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते.यास ४० लाखाहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.
 शंकर जगताप म्हणाले की,अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत मुंबई पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या चिंचवड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी रु. 20.44 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. शहराच्या बाजूने प्रवेशद्वार येथे नवीन प्रवेश लॉबीसह मुख्य प्रवेशद्वार गेट,नवीन पोर्टिको देऊन मोहोर सुधारणा करण्यात येणार आहे.ज्यामध्ये सुधारित शौचालये, पाणी बूथ,एटीएम यांसारख्या अनेक सुविधा असणार आहेत.पार्किंग सुविधांसह फिरणाऱ्या क्षेत्राचा विकास आणि लँडस्केपिंगसह पार्किंगपासून प्रवेशद्वारापर्यंत झाकलेला पादचारी मार्ग विकसीत करण्यात येणार आहे. 04 लिफ्ट आणि 02 एस्केलेटरची तरतूद करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर पूर्ण झाक (सुमारे 2000 चौरस मीटर) प्लॅटफॉर्मची सुधारणा, प्लॅटफॉर्ममध्ये बसण्याची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त मॉड्यूलर फर्निचर तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नवीन सुधारित शौचालये आणि पाण्याची व्यवस्था,दिव्यांगजन अनुकूल शौचालये,तसेच लिफ्ट,रॅम्प आणि वेगळी पार्किंग यासारख्या इतर सुविधा,संपूर्ण स्थानिक परिसराची रोषणाई सुधारणा,सर्व खोल्या आणि फिरणाऱ्या क्षेत्राचा समावेश,कोच निर्देश फलक,व्हिडिओ डिस्प्ले युनिटसह रेल्वे माहिती प्रणाली आणि सुधारित सांकेतिका,दोन्ही प्रवेशद्वार,पाणी बूथ, शौचालये येथे असलेल्या विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण,कंपाऊंड वॉल यासह स्थानिक कला आणि संस्कृती समाविष्ट करणे,पर्यटकांसाठी स्थानिक आकर्षणांची माहिती, इतिहास इत्यादी.शिल्प, पेंटिंग्ज, भिंतीचित्रे, माहितीपूर्ण प्रदर्शने इत्यादींचा समावेश आहे.  
शंकर जगताप म्हणाले की,देशातील 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासच्या उद्घाटनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीतील समन्वय सुधारण्यास मदत होईल.यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल,यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, तसेच रेल्वे आणि इतर संबंधित क्षेत्रातील रोजगारांचा समावेश आहे.रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्याने देशाच्या आर्थिक विकासाला गती होवून यामुळे व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि देशाची प्रगती होईल.’आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती मिळणार असून, यातून देशातील तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा वापर करून रेल्वे क्षेत्रात प्रगती करण्यावर भर दिला आहे. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला आहे.रेल्वे ही एक महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे आणि त्याच्या विकासामुळे लोकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल.भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून रेल्वे प्रवाशांसाठी अनेक नवीन सुविधा उपलब्ध होणार आहेत, रेल्वे क्षेत्रात सुधारणा होण्यास मदत होईल.
 
कोट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासावर भर दिला आहे. ही मोदींची गॅरंटी आहे.गेल्या दहा वर्षात रेल्वेसह सर्व क्षेत्राचा भरमसाठ विकास झाला आहे. २०१४ पूर्वी रेल्वेसाठी ५० हजार कोटींचे बजेट देण्यात येत होते आणि देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी होती. गेल्या दहा वर्षात रेल्वेचे बजेट २.५ कोटी असून देशाची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानी आहे. येत्या पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था तिस-या स्थानावर झेप घेणार आहे.यासाठी रेल्वेचे देशभरात जाळे विकसित केले जात असून नागरिकांना आधुनिक सुविधांनी युक्त रेल्वेचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे.
–  शंकर जगताप, भाजपा शहराध्यक्ष

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय