Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:वैशाली आनंद देशमाने यांना योग भूषण पुरस्कार

PCMC:वैशाली आनंद देशमाने यांना योग भूषण पुरस्कार

पिंपरी चिंचवड /क्रांतिकुमार कडुलकर :वैशाली देशमाने या श्रीहरी योगा स्टुडिओ या माध्यमातून चिंचवड परिसरातील महिलांचे व शहराबाहेरील महिलांचे सुद्धा योगा क्लास घेतात.विशेषतःमहिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पाहिजे तेवढी आरोग्याची काळजी घेत नाहीत व कुटुंबातील महिला निरोगी तर कुटुंब निरोगी म्हणून प्रत्येक महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे याचं उद्देशाने वैशाली देशमाने यांनी श्रीहरी योगा स्टुडिओ या माध्यमातून महिलांना योगाच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहण्याच्या हेतूने जास्तीत जास्त महिलांचे क्लास व प्रभोधन केले आहे.

विशेष म्हणजे भारता बाहेरील सुद्धा अनेक महिला या योगा क्लासला जोडल्या आहेत.विविध संस्था,राजकीय व्यक्ती,नागरिक आदी,चिंचवड परिसरातील या क्लासचे त्यांना पुरस्कार,शुभेच्छा, अभिनंदन,आश्या विविध प्रकारे कौतुक करीत असतात.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहात
या वर्षीचा श्रीरंग बारणे सोशल फौंडेशन वतीने वैशाली देशमाने यांना यांना महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे,कवी,नाटक्कार ,समीक्षक,इतिहास संशोधक ,प्रवचनकार,कीर्तनकार,डॉ.सदानंद मोरे,सिने अभिनेते,अशोक समर्थ यांच्या हस्ते हा योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला
या वेळी श्रीहरी योगा स्टुडिओच्या महिला सदस्या व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
पुरस्कार मिळाल्यानंतर चिंचवड परिसरातील अनेक नागरिक,लोकप्रतिनिधी, मान्यवर यांनी प्रत्यक्ष,फोन,मेसेज आदी द्वारे शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय