Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : वाय.सी.एम. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदानाची घेतली शपथ

PCMC : वाय.सी.एम. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदानाची घेतली शपथ

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत काम करणा-या वैद्यकीय अधिकारी, मेट्रन,स्टाफनर्स व इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचा-यांनी न चुकता,न विसरता १३ मे रोजी होणा-या मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून महत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे (YCM HOSPITAL) अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाची (maval loksabha 2024) निवडणूक येत्या १३ मे रोजी होत आहे, त्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा कार्यालयाकडून कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (pcmc) सर्वात मोठ्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या चाणक्य हॉलमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.राजेंद्र वाबळे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. pcmc news

कार्यक्रमास वैद्यकीय उप अधिक्षक डॉ.मनीषा सूर्यवंशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंगल सुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पेठकर, डॉ.मनजीत संत्रे, मेट्रन वत्सला वाजे,असिस्टंट मेट्रन अनघा भोपटकर, अधिकारी मुकेश कोळप, प्रफुल पुराणिक, सिस्टर इनचार्ज सविता निगडे, एक्स रे टेक्निशियन सालोमन मिसाळ, भास्कर दातीर, लॅब टेक्निशियन अनिल सुतार, ईसीजी टेक्निशियन जितेंद्र शहा, प्रशासन अधिकारी संजय भांगले, रियल लाईफ रियल पीपलचे एम.ए. हुसेन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, कॉम्प्युटर ऑपरेटर विद्या बरके, स्मिता जोशी, दूरध्वनी चालक राजश्री गायकवाड, कार्यालयीन कर्मचारी भगवंता दाभाडे, किशोर पोपटानी,सचिन कांबळे, गणेश आढाव, सुषमा जाधव, आदी कर्मचारी उपस्थित होते.

येत्या निवडणुकीत मतदार यादीत नावाची तपासणी कशी करावी, याबाबत वोटर हेल्पलाइनची सविस्तर माहिती नोडल अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली तर सर्वांना मतदानाची शपथ देऊन मतदानाचा प्रचार, प्रसार आपल्या मित्रपरिवार नातेवाईक यांच्यात करून लोकशाही महोत्सवात उत्साहानी सहभागी व्हावे असे प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र कांगुडे, दिनेश जगताप, महालिंग मुळे यांचे विशेष सहकार्य लाभले. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय