Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सुट्टीचा उपयोग मतदारांनी मतदानासाठी करावा, भव्य मतदार जनजागृती बाईक रॅलीचे...

PCMC : सुट्टीचा उपयोग मतदारांनी मतदानासाठी करावा, भव्य मतदार जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मतदानाच्या दिवशी शासकीय व खासगी आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याबाबत शासनाने कळविले आहे. शहरात इतर ठिकाणी कामे करणाऱ्या नागरिकांना देखील संबंधितांनी सुट्टी देऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे, या सुट्टीचा उपयोग मतदारांनी मतदानासाठी करून आपला मताचा अधिकार बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. (PCMC)

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरात भव्य मतदार जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयुक्त सिंह यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत बाईक रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. (PCMC)

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, राजीव घुले, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, देवेंद्र मोरे, किसन केंगले, रमेश डाळिंबे, मनोज माचरे, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, बिनिष सुरेंद्रण, आशिष चिकने, मेथ्यू जस्टीन, किरण लवाटे, ओंकार पवार, सचिन महाजन, पियुष घसिंग, महापालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, युथ आयकॉन उपक्रमातील स्पर्धक यांच्यासह विविध भागातून आलेले सुमारे ३५० पेक्षा अधिक बाईक रायडर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित्त होते. यावेळी उपस्थित नारिकांनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली. (PCMC)

महापालिकेच्या वतीने शहरात विविध माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रम महापालिका राबवीत आहे.

निवडणूक आयोगाने मतदानासाठी बुधवार,दि २० नोव्हेंबर २०२४ हा सलग सुट्टी नसलेला दिवस निवडला आहे. सुट्टीचा उपयोग इतर कामासाठी न करता मतदानासाठीच सुट्टीचा वापर व्हावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे आयुक्त सिंह म्हणाले. शासकीय व खासगी आस्थापना यांनी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले असून इतर ठिकाणी कामे करणाऱ्या मतदारांना मतदानाच्या सुट्टी देण्याचे आवाहन आयुक्त सिंह यांनी संबधितांना केले आहे.

सर्व मतदारांनी निवडणुकीत मतदान करून आपला मताचा अधिकार बजावावा, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना यावेळी केले.

दरम्यान, निगडी येथील भक्ती शक्ती चौकात जीएनडी ग्रुप च्या बाल कलाकारांनी मतदार जनजागृतीपर नृत्य सादरीकरण केले. या कलाकारांनी आपल्या मनमोहक, चित्तथरारक व प्रबोधनात्मक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आयुक्त सिंह यांनी देखील यावेळी बालकलाकारांचे कौतुक केले. (PCMC)

पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी या मतदार जनजगृती बाईक रॅलीने तिनही मतदार संघातील प्रमुख मार्गांवरुन सुमारे ३३ किलोमीटर अंतर पार केले.

यावेळी रॅलीद्वारे देण्यात येणारा संदेश ऐकण्यासाठी तसेच रॅली पाहण्यासाठी विविध भागात नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाईक रॅली लांडेवाडी भोसरी येथे आली असता महापालिकेच्या वतीने उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या रॅलीची सांगता भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर


संबंधित लेख

लोकप्रिय