पिंपरी चिचंवड / क्रांतीकुमार कडुलकर : आज ७८ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या आनंदात संपुर्ण देशभरात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट आणि ०९ ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून चिंचवडमध्ये आम आदमी पार्टी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)
आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या पुढाकराने यावेळी ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र संग्रमातील महान सेनांनी अभिवादनही करण्यात आले.
आज सकाळी ०८ वाजता आकुर्डी येथील आम आदमी पार्टी येथे आपचे राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, कामगार प्रतिनिधी अनिल पाटील, शहाराध्यक्ष मीना जावळे, प्रकाश परदेशी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर चिंचवड येथील हुतात्मा चाफेकर बंधू यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा यात्रेची सुरूवात करण्यात आली. या यात्रेदरम्यान विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मोरया गोसावी मंदिर येथे जाऊन उपस्थितीत मान्यवरांनी दर्शन घेतले. तर हुतात्मा चाफेकर वाडा येथे अभिवादन करून या यात्रेचा शेवट करण्यात आला. (PCMC)
या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष अजित फटाके, पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, उद्योग आघाडी प्रदेश सचिव संतोष इंगळे, शहराध्यक्ष मीना जावळे, शहर उपाध्यक्ष राजाराम चाकणे, प्रचार प्रमुख अय्याज सय्यद, महासचिव स्वप्निल जेवळे, मीडिया प्रमुख यशवंत कांबळे, उपाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव, सहसचिव सचिन पवार, आरटीआय आघाडी प्रमुख यल्लापा वालदोर, भारती जाधव, पुनम मॅडम, कल्याणी चाकणे, अभिजीत सूर्यवंशी, रवीराज काळे, अजय सिंह, चंद्रमणी जावळे, गिरीश नेटके, सुरेश भिसे, केतन चाभरे, तसेच इतर आप कार्यकर्ते व जागृती पालक युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू